खासदार नारायण राणे यांनी लोकसभेच्या विजयानंतर घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट
देवगड (प्रतिनिधी) ६ जून २०२४
रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर खासदार श्री. नारायण राणे यांनी आज मुंबई येथील शिवतीर्थ या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज साहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांचे व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी शर्मिलाताई राज ठाकरे, आमदार नितेश राणे, मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते.





