बांदा येथिल किराणा व्यापारी विनोद दत्ताराम सातार्डेकर (वय 68) यांचे बुधवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. गुरुवारी दुपारी बांदा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,सुन ,जावई,नातवंडे,भाऊ,बहीण,भावजया असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे