देवगड हायस्कूल मध्ये कौशल्य शिक्षण विकास कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील दोन कोर्स सु

137
Oplus_131074

 

देवगड हायस्कूल मध्ये कौशल्य शिक्षण विकास कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील दोन कोर्स चालू  शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार 

देवगड (प्रतिनिधी) ७ जून २०२४ 

देवगड एज्युकेशन बोर्डाच्या देवगड हायस्कूल मध्ये कौशल्य शिक्षण विकास कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील दोन कोर्स सुरू होत असल्याची माहिती आज लोकल कौन्सिलने पत्रकार परिषदेत दिली

लोकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. खंडेराव बोरफळकर व पदाधिकारी अविनाश माणगावकर यांनी इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजी हा एक वर्षाचा तर डायलेसिस टेक्नॉलॉजी हा पदवी अभ्यासक्रम सुरू होत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले

संपूर्ण जॉब ओरिएंटेड हा कोर्स असून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या मान्यता प्राप्त विद्यापीठातून हे कोर्स देवगड येथे शिकवले जाणार आहेत

इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजी या कोर्ससाठी दहावी पास ही शैक्षणिक पात्रता असून डायलिसिस टेक्नॉलॉजी मध्ये पदवी मिळवण्यासाठी बारावी सायन्स पास ही शैक्षणिक पात्रता आहे

डायलिसिस टेक्नॉलॉजी हा विज्ञान शाखेमधील पदवी कोर्स आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जॉबची हमी या कोर्समुळे मिळणार आहे विविध ठिकाणी डायलिसिस सेंटर उभारले जात असून यामध्ये टेक्निशियन ची कमी सध्या जाणवत आहे या कोर्समुळे ही कमी भरून निघणार आहे विद्यार्थ्यांना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे.

इच्छुकांनी तातडीने देवगड हायस्कूल मधील व्यवस्थापनाशी संपर्क साधावा व आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले आहेत यावेळी स्थानीय समितीचे पदाधिकारी डॉक्टर पुष्कर आपटे, दत्तात्रय जोशी, चंद्रकांत शिंगाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

संस्थेतर्फे डायलिसिस सर्टिफिकेशन हा कोर्सही सुरू करण्याचा प्रयत्न असून मात्र अद्याप याला परवानगी मिळाली नाही परवानगी मिळाल्यास हा ही अध्यक्ष लोकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. बोरफळकर यांनी सांगितले.