देवगड ग्रामीण रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू उबाठा शिवसेना आक्रमक ; युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विचारला डॉक्टरांना जाब
रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी रिक्षाने पुढे हलविले
देवगड /प्रतिनिधी
देवगड ग्रामीण रुग्णालयाला कागदोपत्री उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा दिला. खरा पण हे ग्रामीण रुग्णालय अपुऱ्या सुविधांन अभावी नेहमीच चर्चेत राहिले आहे. याच देवगड ग्रामीण रुग्णालयात आज नाडन येथील दोन दिवसाच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. दोनच दिवसांपूर्वी येथील महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता.देवगड ग्रामीण रुग्णालयात या घडलेल्या दोन घटनांचा जाब विचारण्यासाठी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डॉ संजय विटकर यांची भेट घेऊन याबाबतच्या जाब विचारला. यावेळी चांगली यंत्रणा नसल्यामुळे निष्पाप जीव गेले .गेली पंधरा वर्षे सत्ताधारी लोकप्रतिनिधी रुग्णालयाला चांगली यंत्रणा देऊ शकले नाहीत. त्यामुळे यापुढेही यंत्रणा सुधारली नाही व अशाच घटना घडत राहिल्या तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला.
इळये येथील महिलेचा प्रसूती दरम्यान अति रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. तसेच नवजात बालकाच्या दोन दिवसात शुगर कमी झाल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेबाबत उबाठा शिवसेनेचे वतीने देवगड ग्रामीण रुग्णाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय विटकर यांची भेट घेऊन जाब विचारला यावेळी डॉ. विटकर यांनी सदर महिलेला आवश्यक असलेल्या रक्तगटाचे रक्त रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तसेच नवजात बालकांची ही शुगर कमी झाली होती त्यालाही उपचारासाठी पुढे पाठविण्यात आले होते. मात्र त्याच्या मृत्यू झाला अशी माहिती शिवसेना पदाधिकाराने दिली रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणताही हलगर्जीपणा करत नसून सध्या रुग्णालयात ४ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. ती भरणे आवश्यक आहे तसेच
कार्डिॲक ॲम्बुलन्सची नितांत गरज असल्याचे डॉ विटकर यांनी सांगितले. यावेळी सुशांत नाईक यांनी रुग्णालयासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करू व लागेल ते सहकार्य करू परंतु रुग्णांना चांगली सेवा द्यावी असे सांगितले.
येथील आमदार हे भाजपचेच असून सत्तेत असूनही चांगली यंत्रणा रुग्णालयात उपलब्ध करू शकले नाही. त्यामुळे दोन दिवसापर्वी नवजात मुलाच्या आईचा तर आता दोन दिवसीय नवजात बालकांचा मृत्यू झाला. याला जबाबदार चांगली यंत्रणां न देऊ शकणारे सत्ताधारी लोकप्रतिनिधीच आहेत. असा आरोप करीत यापुढे चांगली यंत्रणा आवश्यक सोयी सुविधा रुग्णालयात दिल्या नाहीत. तर अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी यावेळी दिला. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णू घाडी, नगरसेवक बुवा ता, गणेश वाळके, विकास कोयंडे, प्रथमेश तावडे, योगेश गोळम, उदय करंगुटकर आदी उपस्थित होते.





