देवगड प्रतिनिधी १ मे २०२४
आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या पडेल विभागातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश
देवगड तालुक्यातील सौंदाळे राणेवाडी येथील उभाठा गटाचे असंख्य कार्यकर्ते परशुराम बावकर, लक्ष्मी बावकर, प्रकाश बावकर प्रतिभा बावकर, मधुकर बावकर शितल बावकर, राजन बावकर, रश्मी बावकर ,प्रमोद बावकर ,पायल बावकर, जितेंद्र बावकर अजित मुळम अमित मुळम लक्ष्मी मुळम रंजना मुळंम, शारदा मुळंम, गणेश मुळम, संतोष मुळंम, संध्या मूळंम, संजय मुळम, त्नवी मुळम, अनिरुद्ध मुळम,अक्षय मुळम, सुधाकर धुवाळी, कैलास राणे, कीर्ती राणे, अमोल राणे, सुरेंद्र राणे, विजेंद्र राणे, विजय मुंगेकर, आनंदी राणे, संध्या राणे, हरिचंद्र गुरव ,प्रतिभा तावडे,मालती राणे, यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पडेल विभागातील मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. सौंदळ गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करताना सांगितले.
उपस्थित आमदार बाळ खडपे जिल्हा सरचिटणीस, अमोल तेली पडेल मंडळ अध्यक्ष भाजपा, अंकुश टुकरुल महेंद्र राणे आदि भाजप उपस्थित होते..




