माजी आमदार परशुराम उपरकर पुन्हा स्वगृही

223

सावंतवाडी/ प्रतिनिधी

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी दुरावा घेतल्यानंतर गेल्या काहीपासून माजी उपरकर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत चर्चा होती. श्री. उपरकर यांनी सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेतही दिले होते. मात्र परशुराम उपरकर पुन्हा स्वगृही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळालीआहे याबाबत परशुराम उपरकर यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.उद्धव ठाकरे यांच्या ३ मे रोजी कणकवलीत होणाऱ्या जाहिर सभेवेळी हा प्रवेश होणार असल्याचे समजते.