पाडलोस केणीवाडा येथे आज ‘देवी मूकांम्बिका’ नाट्यप्रयोग
बांदा : प्रतिनिधी
श्री देव राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळ पाडलोस केणीवाडा आयोजित केणीवाडा येथे आज रविवारी 28 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता ‘देवी मूकांम्बिका’ नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देवी भूमिका दशावतार नाट्य मंडळ (नितीन आशयेकर) नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. परिसरातील सर्व नाट्य प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन, श्री देव राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळ पाडलोस यांनी केले आहे.





