कोकणचा प्रतिनिधी म्हणून मला मोदींच्या 400 पार मध्ये पाठवा आणि कोकणचा विकास साधा नारायण राणे

11

कोकणचा प्रतिनिधी म्हणून मला मोदींच्या 400 पार मध्ये पाठवा आणि कोकणचा विकास साधा नारायण राणे

बांदा (प्रतिनिधी)

कोकण अधिक समृद्ध करण्यासाठी मी कटिबद्ध आहे त्यामुळे मला आपण सर्वांनी बहुसंख्य मतांनी निवडून द्यावे आणि मोदींचे हात बळकट करावे असे आवाहन नारायण राणे यांनी केले
बांदा जिल्हा परिषद महायुती कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला त्यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे सोबत मंत्री दीपक केसरकर प्रमोद कामत संजू परब अशोक दळवी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरेगावकर एडवोकेट सुनील केस अनिल केसरकर बबन राणे शीतल राऊत मिलिंद सावंत महेश दूरी गुणाजी गावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते महायुतीच्या बांदायेथील मेळाव्यात बोलताना राणे यांनी विरोधकांचा समाचार घेताना अनेक मुद्दे मांडले. भविष्यात मोदी सरकार सत्तेत येणेआवश्यक आहे ते सांगून पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग नावारूपाला आणल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली .