Home Uncategorized बांदा येथील साईमठात आज रामनवमी उत्सवास दिमाखात प्रारंभ

बांदा येथील साईमठात आज रामनवमी उत्सवास दिमाखात प्रारंभ

8

बांदा येथील साईमठात आज रामनवमी उत्सवास दिमाखात प्रारंभ

बांदा (प्रतिनिधी) दि.१७ एप्रिल २०२४

 साईभक्त कै.बाप्पा केसरकर संस्थापीत बांदा शहरातील साईमठात बुधवारी १७ एप्रील२०२४ रोजी केसरकर कुटुंबीय व श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ यांच्या वतीने रामनवमी उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त होणारे कार्यक्रम पहाटे ५.३० वा. काकडआरती, सकाळी ११.०० वा.साई पुजा, दुपारी१२.०० वा.मध्यान आरती,दुपारी १.०० वा. तिर्थप्रसाद, दुपारी १.३० वा महाप्रसाद,सायं. ६.०० वा. सांज आरती सायं. ७.०० भजन,रात्री १०.००वा. शेजारती अधिक कार्यक्रम होणार आहेत.या रामनवमी उत्सवास उपस्थित राहुन श्री चे आशिर्वाद घ्यावेत व दुपारी महाप्रसाद तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष राकेश केसरकर यांनी केले आहे.