किनळे जयभीम उत्कर्ष मंडळाचे ‘ महाधम्मरक्खिता’ सन २०२४चे पुरस्कार जाहीर , सचिन जाधव सर यांची माहिती

47

किनळे जयभीम उत्कर्ष मंडळाचे ‘ महाधम्मरक्खिता’ सन २०२४चे पुरस्कार जाहीर ; सचिन जाधवसर यांची माहिती

२३ मे बुद्ध पौर्णिमेला होणार पुरस्कारांचे वितरण

देवगड (प्रतिनिधी)दि १७ एप्रिल २०२४

ल रा जाधव गुरुजी स्मृती प्रित्यर्थ त्यांचा परिवार व जयभीम उत्कर्ष मंडळ किनळे ,यांच्या वतीने देण्यात येणारा महाधम्मरक्खिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.यंदांचे पुरस्कार वितरणाचे हे तिसरे वर्ष आहे.दोडामार्ग तालुक्यातील धम्म चळवळीतील कार्यकर्ते एम बी कदम यांना ते करीत असलेल्या धम्म प्रसाराच्या कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे.त्याच बरोबर ,फोंडा तालुका कणकवली येथील दिवंगत दामोदर गोपाळ जाधव, बाव तालुका कुडाळ येथील दिवंगत वि.मो बावकर यांना त्यांनी अनेक वर्ष धम्म चळवळीतील दिलेल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ल रा जाधव गुरुजी यांच्या सावंतवाडी तालुक्यातील मूळ किनळे गावी मे महिन्यात येणाऱ्या बुध्द पौर्णिमेला या पुरस्कारांचे वितरण होणार आहे .
भारतीय बौद्ध महासभा तालुका सावंतवाडी चे अध्यक्ष प्रा.बी पी कांबळी सर ,सचिव पी के चौकेकर ,तालुका आणि जिल्हा प्रमुख पदाधिकारी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून पुरस्कार प्राप्त मान्यवर व्यक्ती त्यांचे कुटुंबीय असे मान्यवर उपस्थितीत राहणार असल्याची माहिती ल रा जाधव गुरुजी यांचे सुपुत्र सचिन जाधव यांनी परिवार व मंडळाच्या वतीने दिली.
या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, शाल ,सन्मानपत्र व भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ असे आहे.
जिल्ह्यात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तींना १००% बौद्धमय वस्तीला दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या सोहळ्यासाठी धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.