३४ हजार किमतीच्या जिलेटीनच्या कांड्या,१३ हजार रुपये किमतीचे डीटोनेटर असा एकूण ७ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

33

३४ हजार किमतीच्या जिलेटीनच्या कांड्या,१३ हजार रुपये किमतीचे डीटोनेटर असा एकूण ७ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

स्थायी सर्वेक्षण पथकाने आंबेरी चेक पोस्टवर केली ही कारवाई

देवगड (प्रतिनिधी)

आंबेरी चेकपोस्टवर शुक्रवारी सायंकाळीं ७ वा. सुमारास स्थायी सर्वेक्षण पथक यांनी रत्नगिरी कडून देवगडचा दिशेने येणारी एक्स युव्ही ५०० या क्रमांकाच्या गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये ३४ हजार किमतीच्या जिलेटीन कांड्या, आणि १३ हजार रुपये किमतीचे डीटोनेटर आढळून आहे.पोलिसांनी ३४ हजार किमतीच्या जिलेटीन कांड्या व १३ हजार किमतीच्या डिटोनेटर व गाडी सहित ७ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मुकेशकुमार लालूराम पवार आणि त्याचा सहकारी देवेंद्र सिंह रमनलाल राठोड मूळ रा राजस्थान सध्या रा पाटगाव देवरूख या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.