बांद्यात होळी पौर्णिमा उत्साहात साजरी

12

बांद्यात होळी पौर्णिमा उत्साहात साजरी

बांदा (मंगल कामत)दि २५ मार्च २०२४

 बांदा येथे रविवारी रात्री पारंपारिक होळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा झाला. होळीचा खुंट येथे होऴी उभी केल्यानंतर धार्मिक विधीनंतर ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे आपले वार्षिक नारळ तसेच नवसाची तोरणे आदि अर्पण केले . यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री ब्राम्हण मंदिर, श्री बांदेश्वर मंदिर,श्री रवळनाथ मंदिर, श्री वेताळ मंदिर ,श्री गणेश मंदिर आणि श्री भुमिका मंदिर आदी देवळांसमोर होळीच्या पुजेचा कार्यक्रम झाल्यानंतर होळीच्या खुटाकडील पुजाविधी आरंभ झाला.त्यानंतर सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.

परंपरेप्रमाणे होळीपासुन बांद्याच्या शिमगोत्सवास आरंभ झाला असुन  पंधरा दिवसांनी बांद्याची रंगपंचमी होणार आहे.