कणकवली तालुक्यातील या गावामध्ये बिबट्याचा वावर ; अनेकदा लक्ष वेधुनही वनविभागाचे दुर्लक्ष, ग्रामस्थ संतप्त

91

कणकवली तालुक्यातील या गावामध्ये बिबट्याचा वावर ; अनेकदा लक्ष वेधुनही वनविभागाचे दुर्लक्ष, ग्रामस्थ संतप्त

कनेडी, शिवडाव, कळसुली, शिरवल, दारिस्ते, हळवल परीसरात बिबट्याचा वावर

कणकवली दि.२६ मार्च (तुळशीदास कुडतरकर)

कणकवली तालुक्यातील कनेडी, शिवडाव, कळसुली, शिरवल, दारिस्ते, हळवल गावच्या परिसरात रविवारी रात्री येथून प्रवास करणाऱ्या एका युवकाला रात्री ८ ३० वाजण्याच्या सुमारास प्रवासादरम्यान रस्त्यावर बिबट्या दिसला.त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या मार्गावर बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेकदा लक्ष वेधुनही वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.

या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तरी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी या मोकाट सुटलेल्या बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करणार का ? असा सवाल पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तसेच जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण ? असाही सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे.