कुडाळ येथे २७ मार्चला युवा महाराष्ट्राभिमान मेळावा ; युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती
कणकवली- देवगड-वैभववाडी तालुक्यातून 500 युवासैनिक मेळाव्यासाठी उपस्थित राहणार
कणकवली ( तुळशीदास कुडतरकर)दि २६ मार्च २०२५
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील युवकांचा युवा महाराष्ट्रभिमान मेळावा बुधवार दि 27 मार्च 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची कणकवली विधानसभेची तयारी पूर्ण झाली असून यात कणकवली- देवगड-वैभववाडी तालुक्यातून 500 युवासैनिक या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज झालेल्या बैठकीत दिली. आज कणकवली विधानसभेची नियोजन बैठक संपन्न झाली. येत्या काळात खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचा निर्धार करण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक कुडाळ येथील मेळाव्यास उपस्थित राहून खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचा निश्चय करणार आहेत. या युवकांच्या माध्यमातून मेळाव्यातील संदेश व खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचा निर्धार हा गावा गावात पोहचणार आहे.
कणकवली येथे पार पडलेल्या बैठकीस नवनिर्वाचित कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, कणकवली तालुका संघटक राजू राठोड, युवासेना तालुका समन्व्यक तेजस राणे, गुरु पेडणेकर, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, धीरज मेस्त्री, बाबू घाडी, रोहित राणे, सोहम वाळके, किरण वर्दम, सचिन आचरेकर, आदित्य सापळे, रवि गिरकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.





