छातीत दुःखू लागल्याने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल ; उपचारादम्यान मृत्यू
देवगड (प्रतिनिधी) दि .२१ मार्च २०२४
जामसंडे येथे पुट्टा फॅक्टरी मध्ये काम करणार कामगार इंद्रजीत दुःखी निसाद वय ४६ राहणार ग्राम ब्रह्मशैली उत्तर प्रदेश सध्या राहणार जामसंडे देवगड यांच्या अचानक छाती दुखू लागल्याने व रक्ताची उलटी झाल्याने त्याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात २१ मार्च रोजी सकाळी ८:३० वाजता दाखल केले .मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतची खबर प्यारेलाल रामसजीवन निसाद वय ३४ राहणार हमीदपूर उत्तर प्रदेश सध्या राहणार कुंभारमाठ मालवण यांनी देवगड पोलिसात दिली असून देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करत आहेत.





