दुचाकी स्वाराची पडलेली बॅग शिवप्रसाद पेडणेकर यांनी केली परत

87

दुचाकी स्वाराची पडलेली बॅग सामाजिक  कार्यकर्ते शिवप्रसाद पेडणेकर यांनी केली परत

देवगड (प्रतिनिधी) दि २१ मार्च २०२४

देवगड एसटी आगारातील कर्मचारी लवू सरोदे हे आपले कार्यालयातील काम आटपून घरी जात असताना बुधवार रात्री ८ वाजणेच्या सुमारास देवगड मेनरोड वर दोस्ताना सायकल मार्ट समोर मोटार सायकल स्वाराच्या गाडीवरून एक बॅग रस्त्यावर पडली होती.
आपले दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री.शिवप्रसाद पेडणेकर यांच्या दृष्टिपथास ही बॅग येताच, त्यांनी ती उचलली व वैभव बांदेकर, ओमकार मसुरकर, सचिन मुणगेकर यांच्या देखत ती उघडून आतील डायरीतील नंबर वरून काॅल करून ती बॅग मालकाच्या ताब्यात देण्यात आली. देवगड एस टी डेपोतील शिवप्रसाद पेडणेकर यांचे आभार मानून ती बॅग आपल्या ताब्यात घेतली.