बांदा पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई 19 लाखांच्या दारूसह ट्रक जप्त
बांदा (प्रतिनिधी) दि २१/३/२०२४
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांधा पोलिसांनी इन्सुल येथील तपासणी नाक्यावर सर्वनाची कसूर तपासणी करण्याची सुरुवात केली आहे या तपासणी दरम्यान गोव्यातून तेलंगणा आंध्र प्रदेश येथे गोवा बनावटीच्या अवैध दरवातुकी प्रकरणी 19 लाख 54 हजार 560 रुपयांच्या दारूसह 29 लाख 54 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी मोरला रवी व गुडीपुडी आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान करण्यात आली.
याबाबतची घटना अशी बांदा पोलिसांच्या इन्सुलि तपासणी नाक्यावर सर्वच वाहनाची कसूर तपासणी करून केली जात आहे बुधवारी रात्री टाटा ट्रक झिरो पाच यु डी 27 57 हा तपासणीसाठी थांबविण्यात आला त्यावेळी चालकाकडे विचारणा केली असता समर्पक उत्तर न मिळाल्यामुळे त्या ट्रकची तपासणी केली असता त्यामुळे गोवा बनावटीची अवैध दारू 19 लाख 54 हजार रुपये किमतीचा गोल्डन हवक प्रीमियम ब्रांडी मिळून आली याप्रकरणी या दारूसह दहा लाख रुपयांचा ट्रक ही जप्त करण्यात आला व दोघांना ताब्यात घेण्यात आले
ही कारवाई सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरव कृमा अग्रवाल उपाविभागीय पोलिस अधिकारी घनश्यामराव यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे पोलीस हवालदार देवदत्त कांढरकर पोलीस शिपाई राकेश चव्हाण पोलीस हवालदार सीताका नाईक पोलीस नाईक बाळकृष्ण गवस होमगार्ड सतीश सावंत शिवशंकर सावंत तुकाराम जंगले स्थायी सर्वेक्षण पथक आनंद मांजरे कर प्रवीण राऊळ यांनी केली





