Home महाराष्ट्र देवगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी देवगडात पोलिसांचे संचलन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी देवगडात पोलिसांचे संचलन

33

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी देवगडात पोलिसांचे संचलन

देवगड,ता.१८ मार्च २०२४

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी देवगड शहरात व जामसंडे बाजारपेठ या ठिकाणी पोलिसांनी संचलन केले. पोलिसांनी यात बीट पोलीस ठाणे अंमलदार व आरसीपी अंमलदार यांची हजेरी घेतली व त्यांना निवडणूक आचार संबंधित सूचना दिले. तसेच मार्गदर्शन केले यात ३ अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक एस बी देवकर, देवगड पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.