सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हा भाजपचा (कमळ) चिन्हाचा असावा अशी होतेय मागणी..

216

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी किरण सामंत यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता ?

लोकसभेच्या विशाल मतदार संघासाठी विशाल पर्वाची चर्चा…!

सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हा भाजपचा (कमळ) चिन्हाचा असावा अशी होतेय मागणी..

सिंधुदुर्ग :- विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी भैय्या सामंत यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता,विशाल परब आहेत शर्यतीत.
भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण ?अशी चर्चा गेले आठ ते दहा दिवस सुरू आहे.या चर्चेत केंद्रीय मंत्री नारायण राणे,भैय्या सामंत,विशाल परब यांच्या नावाची चर्चा जोर धरत होती.मात्र आत्ताच मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचे माहिती मिळत आहे.यामुळे पुन्हा एकदा उमेदवार कोण ? या चर्चेला उधाण आले असून महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू भैया सामंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.मात्र या चर्चेतही अजूनही विशाल परब यांचेही नाव चर्चेत येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भैय्या सामंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त असल्याचेही माहिती मिळाली आहे.मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हा भाजपचाच असावा अशी भाजपची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी असल्याने भैय्या सामंत यांना जर उमेदवारी निश्चित झाली तर ते भाजप चिन्हावर निवडणूक लढवणार का ?असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.उद्यापर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण ? हे निश्चित होईल अशी शक्यता आहे.