रोणापाल माऊली पंचायतनचा मंगळवारी वर्धापनदिन सोहळा

29

रोणापाल माऊली पंचायतनचा मंगळवारी वर्धापनदिन सोहळा

बांदा (प्रतिनिधी) दि १८ मार्च २०२४

रोणापाल ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतनचा ७० वा पूनर्वर्धापन दिन सोहळा मंगळवार 19 मार्च रोजी साजरा होत आहे त्यानिमित्त मंदिरात संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानिमित्त सकाळी श्रींची पूजाअर्चा, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी स्थानिकांची भजने व रात्री ८ वाजता श्रीदेवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीने चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘श्री देव क्षेत्रपाल वेतोबा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.