२८ लाख ८८ हजारांच्या अवैध दारूसह ६३ लाख ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त
खारेपाटण चेक पोस्टवर कणकवली पोलीस व एक्साइसची एक्साईज पथकाची संयुक्त कारवाई
कणकवली (प्रतिनिधी) दि. १८ मार्च २०२४
खारेपाटण चेकपोष्ट वर गोवा बनवण्याच्या अवैध दारुने भरलेला आयशर टेम्पो सह तब्बल ६४ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल कणकवली पोलीस एसएसटी पथक आणि एक्साईज कणकवलीच्या पथकाने पकडला आहे .या गुन्ह्यात टेम्पो चालक -मालक दिनेश रमेश व्यास व ३९ राहणार अहमदाबाद गुजरात (सध्या राहणार वसई) याला अटक केली आहे.खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे यांच्या सतर्कतेमुळे ही अवैध दारू पकडण्यात यश आले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, कणकवली पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांच्या सूचनेनुसार पोलीस यंत्रणा अधिक अलर्ट झाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात सर्वत्र आचारसंहिता जाहीर झालेली असतानाच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पोलीस चेक पोस्ट येथे आज १८ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम एच ४८ बीएम ९६९१ ची पोलीस नाईक उद्धव साबळे यांनी तपासणी केली व टेम्पोच्या हौद्यात दारू साठा आढळताच साबळे यांनी वरिष्ठांना कळविले.
चेकपोस्ट वरील एसएसटी टीम मधील आर एल शिंदे बापू कुचेकर यांनी एक्साईज कणकवली निरीक्षक नितीन शिंदे यांना कळविले. त्यानंतर कणकवली पोलीस तसेच एक्साईजच्या पथकाने संयुक्त कारवाई करत तब्बल २८ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा अवैध दारूसह ३५ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ६३ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही संयुक्त कारवाई पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस नाईक उद्धव साबळे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते एसएसटी प्रमुख अनिल शिंदे बापू कुचेकर एक्साईज कणकवली निरीक्षक नितीन शिंदे महिला पोलीस जवान एस एस कुवेस्कर यांच्या पथकाने केली .याबाबतचा अधिक तपास एक्साईज कणकवलीचे निरीक्षक नितीन शिंदे करत आहे.





