उपजिल्हा रुग्णालय परिसर झाला चकाचक कणकवली माऊली मित्रमंडळाकडून स्वच्छता
कणकवली( तुळशीदास कुडतरकर ) दि १८ मार्च २०२४
कणकवली येथील माऊली मित्र मंडळाच्या वतीने रविवारी उपजिल्हा रुग्णालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. मंडळाच्या सदस्यांबरोबरच नागरिक या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या उपस्थितीत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी माऊली मित्रमंडळाचे पदाधिकारी, नागरिक आणि आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी माऊली मित्रमंडळाचे सुभाष उबाळे, सी. आर. चव्हाण, नीलेश निखार्गे नामदेव मोडक,भगवान कासले, अविनाश गावडे, प्रशांत पाताडे, प्रभाकर कदम, उदय मालप, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर हनुमंते, परिचारिका प्रिया कदम, औषध निर्माता प्रीती कोरगावकर, कक्षसेवक सचिन तांबे, सुरक्षारक्षक अमित परब आदी उपस्थित होते.
यावेळी अशोक करंबेळकर म्हणाले, आरोग्याचा प्रश्न सगळीकडे गंभीर स्वरूप धारण करत आहे. शासकीय व निमशासकीय यंत्रणेतली सफाई कामगारांची संख्या पुरेशी नाही. शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, प्रोत्साहनपर बक्षिसे आहेत. मात्र नागरिकांनी स्वतःहून स्वच्छता करणे आवश्यक आहे.





