इन्सुली येथे तिहेरी अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

29

इन्सुली येथे तिहेरी अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

बांदा (प्रतिनिधी) दिनांक १६  मार्च २०२४

इन्सुली सोहिरोबानाथ आंबीये मंदिर समोर तीन वाहनांमध्ये अपघात झाला आहे. उभ्या असलेल्या एसटी बसला पाठीमागून ट्रक व डंपरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणालाही जीवितहानी झाली नाही. परंतु यात तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.


सावंतवाडी-दोडामार्ग एसटी बस याठिकाणी प्रवासी घेण्यासाठी उभी होती. त्याचवेळी पाठीमागून भरधावं वेगात आलेल्या ट्रकने एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्याचवेळी वेगात असलेल्या डंपर चालकाला वेग आवरता न आल्याने त्याने ट्रकला पाठीमागून धडक दिली.