साळशी येथिल विकास कामांचे भूमिपूजन सरपंच यांच्या हस्ते पार पडले.

33

साळशी येथिल विकास कामांचे भूमिपूजन सरपंच यांच्या हस्ते पार पडले.

देवगड (प्रतिनिधी) दि १६ मार्च २०२४

देवगड तालुक्यातील साळशी येथे खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन गावच्या सरपंच वैशाली सुतार यांच्या हस्ते गुरुवारी श्रीफळ वाढवून पार पडले.
साळशी मांगवहाळी ते बौद्धवाडी पर्यंतचा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती सदरचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करून मिळावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती या रस्त्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या स्थानिक विकास निधी २०२३-२४ मधून आठ लाखाचा निधी मंजूर झाला आहे .

तसेच साळशी धनगरवाडीकडे जाणारा रस्ता तयार करण्यासाठी जनसुविधा योजनेतून पाच लाखाचा निधी मंजूर झाला आहे ही दोन्ही विकास कामे मार्गी लागल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यास सरपंच वैशाली सुतार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विक्रांत नाईक, माजी सरपंच किशोर साळसकर, ग्रामपंचायत सदस्य वैभव साळसकर, वंचित बहुजन आघाडीचे देवगड तालुकाध्यक्ष प्रभाकर साळस्कर, महेंद्र साळस्कर, विश्वास साळसकर, विजय सुतार, मंगेश नाईक, रवींद्र गावकर, रमेश खरात, लक्ष्मण खरात, रुपेश गावकर, संतोष तेली, विजय गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.