ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी हक्क समजून घ्यावेत -दादा कुडतरकर

47

ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी हक्क समजून घ्यावेत -दादा कुडतरकर

कणकवली येथे जागतिक ग्राहक दिनात शंकांचे निरसन

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)दि १६ मार्च २०२४

ग्राहकांनी आपले हक्क समजून घेतले पाहिजेत. तसे झाले तर ग्राहकांची फसवणूक निश्चितच टळेल. त्यामुळे ग्राहकांनी सजग राहून आपले हक्क समजून घ्यावेत, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा संघटक सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी केले.

कणकवली येथील पेन्शनर भवनमध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादा कुडतरकर होते. यावेळी ते बोलत होते.

दादा कुडतरकर यांनी जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व, ग्राहक संरक्षण कायदा १९८६, त्यानुसार ग्राहकांचे हक्क व अधिकार, ग्राहक पंचायतीचे कार्य, ग्राहकांची वेगवेगळ्या मार्गाने होणारी फसवणूक, त्यावर तक्रार कशी व कोठे करावी, ऑनलाइन फसवणूक होऊ नये, याबद्दल काय
दक्षता घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले

कणकवली येथे जागतिक ग्राहक दिन

कार्यक्रमाच्यावेळी सीताराम कुडतरकर, श्रद्धा कदम आदी उपस्थित होते. ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष श्रद्धा कदम, तालुका सचिव पूजा सावंत यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सेवानिवृत्त वेतनधारकांनी अनेक प्रश्न विचारून चर्चेत सहभाग घेतला व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. तसेच
ग्राहक पंचायत ही चळवळ लोकांपर्यंत तळागाळातील पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले.

या कार्यक्रमाला सेवानिवृत्त वेतनधारक संघटनेचे सचिव व्ही. के. चव्हाण तसेच इतर सदस्य उपस्थित होते. ग्राहक पंचायतीचे सदस्यही यावेळी उपस्थित होते.