देवगड जामसंडे नगरपंचायतीने राबविली कुणकेश्वर बीचवर स्वच्छता मोहीम

73

देवगड जामसंडे नगरपंचायतीने राबविली कुणकेश्वर बीचवर स्वच्छता मोहीम

देवगड ( प्रतिनिधी)१६ मार्च २०२४

दक्षिण कोकणची काशी असलेल्या श्रीक्षेत्र कुणकेश्वर ची महाशिवरात्री यात्रा नुकतीच संपन्न झाली. या यात्रोत्सवानंतर या ठिकाणी झालेल्या अस्वच्छतेमुळे देवगड जामसंडे नगरपंचायत व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबवून कुणकेश्वर मंदिर परिसर कुणकेश्वर समुद्रकिनारा परिसर स्वच्छ करण्यात आला.

कुणकेश्वर मंदिर परीसर व समुद्रकिनारा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर स्वच्छता अभियानामध्‍ये देवगड तहसीलदार श्री.श्रीकृष्ण ठाकुर, देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी श्री.सुरज कांबळे प्रशासकिय अधिकारी श्री. रोहित पाटील कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंच माजी उपसरपंच व ग्रामसेवक श्री गुणवंत पाटील नगरपंचायत कर्मचारी, तलाठी, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ सहभागी होते.