मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि कारमध्ये अपघात;दोघे जखमी जखमींना कणकवलीत खाजगी रुग्णालयात हलविले

324

मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि कारमध्ये अपघात;दोघे जखमी जखमींना कणकवलीत खाजगी रुग्णालयात हलविले

अपघातातील दोघे जखमी देवगड तालुक्यातील गिर्ये मधील

कणकवली (प्रतिनिधी)दि २ मार्च २०२४

मुंबई गोवा महामार्गावर जानवली गावठाणवाडी येथे पुढे जाणाऱ्या ट्रकला धडक बसल्याने अपघात झाला.हा अपघात शनिवार २ मार्च रोजी सकाळी
साडेआठ ते नऊच्या दरम्यान झाला. या अपघातात कारचालक व अन्य जखमी झाले असून त्यांना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कारमधील जखमी हे देवगड तालुक्यातील गिर्ये गावातील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आसरोंडी येथून चिरे वाहतूक करणारा ट्रक (MH 09 L 0637) हा फोंडा येथे जात होता. त्याचवेळी कणकवलीहुन देवगडच्या दिशेने येणारी सुजुकी कंपनीची कार (MH 05 EQ 47 61) येत होती. जानवली गावठाणवाडी येथे कार चालकाने ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार ट्रकच्या पुढील बंपरला घासली. त्यानंतर पुढे जाऊन दुभाजकावर आदळून दोन-तीन पलटी मारून महामार्गावर थांबली. या अपघातामध्ये कारमधील चालक परशुराम प्रभाकर घाडी आणि प्रकाश परशुराम घाडी (वय ५६ दोन्ही रा गिर्ये,ता. देवगड) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर जखमींना कणकवलीतील खाजगी रुग्णाला ठरविण्यात आले .या अपघातानंतर ट्रक चालक महेश वाळवे (वय ४५ रा तिवरे, कणकवली ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.या घटनेच्या अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.