कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेचे प्रथम पूजेचे निमंत्रण उद्योजक किरण सामंत यांना
कणकवली येथे दिले श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी निमंत्रण
देवगड (प्रतिनिधी) दि २ मार्च २०२४
श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सवादिवशी श्री देव कुणकेश्वराची पहिली पूजा आपल्या हस्ते व्हावी यासाठी उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांची श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथे भेट देऊन यात्रा उत्सवाचे निमंत्रण देत प्रथम पूजेला येण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे .
या पत्रात नमूद केले आहे की,
कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते. तसेच धार्मिक पर्यटन क्षेत्रामध्ये प्रामुख्याने श्री तिर्थक्षेत्र कुणकेश्वरचा उल्लेख आहे. या ठिकाणी वर्षभरामध्ये लाखो भाविक भक्त यात्रेकरु येत असतात. ‘कोंड नेस्ट ट्रॅव्हलर’ तर्फे प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये जागतिक ३० सुंदर पर्यटन स्थळांमध्ये भारतातील उल्लेखिलेल्या ०९ स्थळांमध्ये श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. हि बाब आपणा सर्वांना अभिमानास्पद आहे.
या तीर्थक्षेत्री दरवर्षी लाखो शिवभक्त व यात्रेकरूंच्या उपस्थितीमध्ये मोठी यात्रा भरते.
प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षी शुक्रवार दि. ०८ मार्च २०२४ ते रविवार १० मार्च २०२४ या कालावधीत श्री क्षेत्र कुणकेश्वर मध्ये महाशिवरात्री यात्रा मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.
दरम्यान गुरुवार दि. ०७ मार्च २०२४ रोजीच्या रात्रौ १२:०० वा. नंतर (दि. ०८ मार्च २०२४ मध्यरात्रौ ठिक ०१:०० वा.) “श्रीं” ची प्रथमपूजा परंपरेनुसार केली जाणार आहे.दरवर्षी मंदिरामध्ये प्रथम पुजेचा मान देवस्थानचे देणगीदार तसेच मंत्री महोदय अशा मान्यवरांना देण्यात येत असतो. तरी या वर्षीचा प्रथमपूजेचा मान आपण स्विकारावा
अशा असे पत्र उद्योजक किरण सावंत यांना श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कणकवली येथील भेटीदरम्यान देण्यात आले.
यावेळी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे,उपाध्यक्ष दिनेश धुवाळी,संजय आचरेकर,अजय नानेरकर, राम तेजम आदी उपस्थित होते.



