स्वच्छतेच्या नावाखाली प्रसूतीसाठी दाखल केलेल्या माताकडून पैसे घेण्याचे प्रताप झाले उघड;कंत्राटी महिला सफाई कर्मचारी सेवेतून बडतर्फ
देवगड ग्रामीण रुग्णालयातील या प्रकाराने खळबळ
देवगड (प्रतिनिधी) दि २६ फेब्रुवारी २०२४
प्रसुतीसाठी रुग्णालयात आलेल्या मातेकडून स्वच्छतेच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना मनसेच्या आक्रमक भूमिकेचा दणका बसला असून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय विटकर यांनी संबंधित महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ केले आहे. देवगड रुग्णालयातील या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
देवगड ग्रामीण रुग्णालयमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिला रुग्णांकडून रुग्णालयातीलच महिला सफाई कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने पैसे घेत असल्याची तक्रार लेखी निवेदनाद्वारे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे यांनी केली होती. यावेळी त्यांच्यासमवेत तळवडे शाखाध्यक्ष सिद्धार्थ जाधव, प्रतीक जाधव, बबलू परब व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. तक्रारीचे निवेदन देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय विटकर यांना दिले होते .या तक्रारीची गंभीर दखल घेऊन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर संजय विटकर यांनी संबंधित महिला सफाई कर्मचारी यांना कामावरून काढून टाकण्याचे आदेश दिले.
निवेदनांमध्ये रुग्णालयातील प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांकडून रुग्णालयातीलच महिला सफाई कर्मचारी नियम बाह्य पद्धतीने पैसे घेतल्याची तक्रार आली असून या कर्मचाऱ्यांने केलेले कृत्य हे शासकीय रुग्णालयाची तसेच शासनाची प्रतिमा मलीन करणारी आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ नुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर उचित कार्यवाही करावी व आपल्या रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना उपचार करण्याबाबत आपल्या कर्मचाऱ्यांना फक्त सूचना देण्यात याव्यात. रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयातील महिला सफाई कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी व यापुढे कोणतेही गैरकृत्य देवगड रुग्णालयातून होऊ नये. कारवाई न झाल्यास अथवा संबंधित कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे प्रकरण हाताळवे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. हे निवेदन डॉक्टर संजय विटकर यांच्याकडे देण्यात आले या तक्रारीची ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर विटकर यांनी गंभीर येथे दखल घेत संबंधित महिला सफाई कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात येत आहे. असे आदेश दिले .आदेशामध्ये त्यांनी तक्रार अर्जानुसार व रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या मातांकडून अशासकीय रित्या स्वच्छतेच्या नावाखाली पैसे घेत असल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आले.तरी तात्काळ प्रसुती मातांकडून घेतलेले पैसे परत करण्यात यावेत.महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व वर्तणूक यांचा भंग केल्यामुळे आपणास या कार्यालयाकडून 25 फेब्रुवारी 2024 रोजी कामावरून काढून टाकण्यात येत आहे .तसेच यापुढे रुग्णालयातील कोणत्याही प्रकारचे काम करण्याचे नाही. तसेच आपल्या ताब्यात असलेले शासकीय निवासस्थान सात दिवसात खाली करून या कार्यालयाच्या ताब्यात देण्यात यावे. अन्यथा आपल्यावर पुढील योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे या आदेशात म्हटले आहे.





