शतकोत्तर व्यापाराची उलाढाल त्याच उमेदित टिकविणे जिकिरीचे काम – प्रसाद पारकर

248

शतकोत्तर व्यापाराची उलाढाल त्याच उमेदित टिकविणे जिकिरीचे काम – प्रसाद पारकर

व्यापारी सत्कार सोहळा देवगड तालुका व्यापारी संघाच्या वतीने केले होते आयोजन

देवगड (प्रतिनिधी) दि.२७ फेब्रु २०२४

देवगड तालुक्यात त्याकाळी दळणवळणाची कोणतीही साधने व्यवस्थितरित्या उपलब्ध नसतानाही आपल्या संस्था,फर्म दुकाने चालू करून व्यापारी व्यापाराच्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सेवा देणे. आणि त्याचं संस्था फर्म दुकाने यांच्या व्यवसायांची होत असलेली १०० किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे होत असलेली उलाढाल शतकोत्तर पेक्षा जास्त त्याच उमेदित टिकविणे हे मोठे जिकिरीचे काम असल्याचे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले.

देवगड तालुक्यातील व्यापारी वर्गांला आजही उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या संस्था दुकाने यांच्या सत्कार प्रसंगी ते देवगड मध्ये बोलत होते.
देवगड तालुक्यातील व्यापारीवर्गाला बाजारपेठ मध्ये व्यापार करण्यास खुप मर्यादित वाव होता,तरीपण आपल्या तालुक्यातील गावांमधील काही व्यापारी संस्था(दुकाने आणि फर्म) १०० किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे आजही त्याच उमेदीने, त्याच कार्यक्षमतेने चालू आहेत ! ह्याचा देवगड तालुका व्यापारी संघाला सार्थ अभिमान आणि आनंद आहे ! आज चालू असलेल्या तरुण आणि नवोदित असलेल्या व्यापारी बंधूंना भविष्यात व्यापार करताना मार्गदर्शन मिळावं आणि उज्वल भविष्य निर्माण व्हावं ह्या हेतूने आपण त्याच्या प्रती शुभेच्छा व्यक्त करून त्यांचा भव्य सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन देवगड तालुका व्यापारी संघाच्या वतीने जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर व तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड सातपायरी येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह , श्री नितीन वाळके, श्री प्रसाद पारकर, भाई वातकर, राजाभाऊ कदम, मधुकर नलावडे, प्रमोद नलावडे,व्यापारी संघाच्या महिला तालुकाध्यक्ष प्रियांका साळसकर आदी उपस्थित होते.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा या वर्षीचा आदर्श तालुका अध्यक्ष पुरस्कार श्री शैलेश कदम यांना मिळाला ,या निमित्ताने त्यांचा देवगड तालुका व्यापारी संघ कडून सत्कार करण्यात आला.
या शतकोत्तर सत्कारमूर्ती व्यापारी संस्था आणि फर्ममध्ये याचे सत्कार करण्यात आले यामध्ये मे. एल आर. जोशी (श्री. पद्माकर जोशी)देवगड,२) मे.कार्लेकर- भिडे ( श्री.कार्लेकर भिडे) वाडातर ,३) मे. श्रीराम मोरेश्वर गोगटे (श्री. प्रकाश जनार्दन गोगटे)जामसंडे,४) श्री.अमृत विष्णू नलावडे ( श्री.प्रमोद हरी नलावडे )देवगड,५) श्री.मोतीराम नारायण माणगावकर ( श्री.विजय नारायण माणगावकर )मोंड,६) कल्पना वस्त्रालंकार ( श्री.महेश प्रकाश खाड्ये) तळेबाजार ,७)मे. ए ए आगा अँड कंपनी (अब्दुल गफुर आगा ) हिंदळे, ८)मे. दत्तात्रय महादेव वळंजू आणि कंपनी (श्री .सचिन रमाकांत वळंजू ) मिठबाव आदीचे सत्कार करण्यात आले.

यावेळी उपस्थित व्यापारी वर्गाने आपल्या व्यवसायातील संस्था व फर्म याबाबतच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी देवगड तालुका व्यापारी संघाची सर्व पदाधिकारी तालुक्यातील व्यापारी वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री मिलिंद कुबल यांनी केले तर प्रस्तावना सौ प्रियांका साळसकर यांनी केली व उपस्थितांचे आभार शैलेश कदम यांनी व्यक्त केले.