आमदार भास्कर जाधव यांना अटक करा ; भाजपा पदाधिकारी यांनी दिले पोलिसांना निवेदन
देवगड (प्रतिनिधी) दि ७ फेब्रु. २०२४
कणकवली येथे झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात आक्षेपाय केलेल्या विधानाच्या निषेधार्थ भाजपा पदाधिकाऱ्यांनी देवगड पोलीस स्टेशनमध्ये आज निवेदन देऊन आमदार भास्कर जाधव यांच्या अटकेची मागणी केली.
या निवेदनात म्हटले आहे की,उबाठा सेनेचे कणकवली जाहीर सभा झाली या सभेत आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन जनतेमध्ये प्रक्षोभ होईल अशा प्रकारची टीका केली . या त्यांच्या वक्तव्यामुळे सिंधुदुर्गात, महाराष्ट्रातही संतप्त प्रतिक्रिया उमटू शकते.आणि ही संस्कृती कणकवली मतदार संघातील राजकारणाची नाही. भास्कर जाधव यांच्या बेछूट वक्तव्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन समाजात अशांतता निर्माण होऊ शकते .
त्यामुळे भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून कारवाई करावी .आपण यावर कायदेशीर कारवाई केली नाही तर आम्ही उग्र पद्धतीचे आंदोलन छेडू व त्यास, सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन राहील अशा आशयाचे निवेदन भाजपा पदाधिकाऱ्यांनी देवगड पोलीस निरीक्षक यांना दिले आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी बाळा खडपे, प्रकाश राणे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,यश रानडे आदी उपस्थित होते.





