देवगड तालुक्यातील कोर्ले गावचा सुपुत्र असित नितीन करंदीकर तबला “अलंकार”परीक्षेत यश

227

देवगड तालुक्यातील कोर्ले गावचा सुपुत्र असित नितीन करंदीकर तबला “अलंकार”परीक्षेत यश

देवगड (प्रतिनिधी)दि. ७ फेब्रु २०२४

देवगड तालुक्यातील कोर्ले गावचा सुपुत्र असित नितीन करंदीकर तबला “अलंकार”परीक्षा (post graduation in Tabla vadan)ही परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
असित करंदीकर याने तबल्याचे प्राथमिक शिक्षण चेंदवणकर सर यांच्याकडे घेतले. शालेय शिक्षणामध्ये पेंडुरकर सर यांच्याकडून तबलावादनाचे शिक्षण घेतले.
सध्या तो “स्वर- ताल साधना संगीत विद्यालय पुणे. संजय करंदीकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहे.तो ढोलकी वादनाचेही शिक्षण घेत असून, पुणे येथे “तालचक्र”या ढोल पथकामध्ये तासावादन ही करतो.
सुरुवातीपासून असलेली वादनाची आवड, चिकाटी सातत्य व मेहनत यांच्या जोरावर सुपुत्र असित नितीन करंदीकर तबला “अलंकार”परीक्षा (post graduation in Tabla vadan)ही परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.