देवगड तालुका तेली समाजाचा
४ फेब्रुवारी रोजी स्नेह , सांस्कृतिक मेळावा
देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ देवगड आयोजित देवगड तालुका तेली समाज वार्षिक गुणगौरव व स्नेह व सांस्कृतिक मेळावा रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी दहा ते तीन या वेळेत महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा अध्यक्ष सतीश वैरागी, विघ्नेश्वर पतपेढी मुंबई कोकण विभाग चे अध्यक्ष जनार्दन गवाणकर, युरेका सायन्स क्लब एज्युकेशन होमी बाबा बाल वैज्ञानिक जिल्हा समन्वयक संस्थेचे संस्थापिका सुषमा केणी, सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा जिल्हा अध्यक्ष एकनाथ तेली, जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली ,देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अशोक तेली, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, देवगड शिक्षण विकास मंडळ खजिनदार मिलिंद खानविलकर, महिला आघाडी अध्यक्ष सौ प्रीती वाडेकर, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान सर्वोत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार २०२४ संदीप तेली संदीप श्रीकांत तेली, प्रगतशील आबा बागायतदार म्हणून कृषिरत्न पुरस्कार २०२४ जनार्दन शंकर तेली , सामाजिक ऐक्य व उपक्रमशील गाव पुरस्कार घेऊन कुणकेश्वर व कोर्ले गाव प्रतिनिधी यांना गौरवण्यात येणार आहे. तसेच यावेळी दहावी बारावी पदवी व विशेष प्राविण्य सर्वोत्तम पाच व इतर या गुणवंतांचा गुणगौरव समारंभ, व्यावसायिक व शैक्षणिक मार्गदर्शन, सांस्कृतिक सोहळा, लकी ड्रॉ कूपन , व हळदिकंकु आदी कार्यक्रमाचे संपन्न होणार आहेत . या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष व तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहे. सर्व तेली समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन व्यवस्थापन समिती देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ देवगड यांच्या वतीने करण्यात आली आहे.





