उमा मिलिंद पवार ( इंग्लिश मिडीयम) हायस्कूलची पूर्वा केतकर हिची कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड
देवगड (प्रतिनिधी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व क्रीडापरिषद यांच्यावतीने दि. २९ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ रोजी हिंगोली या ठिकाणी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये उमा मिलिंद पवार हायस्कूल (इंग्लिश मिडीयम) स्कूलची विद्यार्थिनी पूर्वा केतकर सहभागी झालेली होती. त्या स्पर्धेमध्ये तिने पाचवा क्रमांक मिळवून तिची निवड वाराणसी येथे होणाऱ्या राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे मुंबई येथे असोशिएशन तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये देखील पूर्वा दिपक केतकर हिने तृतीय क्रमांक मिळवून तिची निवड वाराणसी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर कॅरम स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे.
प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. गुडेकर सर व संस्थेचे सचिव श्री. योगेश पाटकर
यांचे तिला मार्गदर्शन लाभले.त्याच प्रमाणे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.





