छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे होणार आम.नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार महाआरती ; १९९२ ला अयोध्येत गेलेल्या कार सेवकांचा सत्कार
कणकवली : प्रतिनिधी
अयोध्येत होतं असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या कार्यक्रमांतर्गत देशभरातील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहे.त्यानुसार २२ जानेवारी रोजी कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात येणार आहे. तसेच याचवेळी १९९२ साली कार सेवक म्हणून अयोध्येला गेलेल्या मतदारसंघातील कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यातील कार सेवकांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे सायंकाळी ७.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे तर त्या नंतर प्रभू श्रीराम यांचेवर महान पौराणिक नाटक होणार आहे.
दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सदरहू कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघाचे आमदार श्री. नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली मध्ये श्री शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ७.०० वाजता महाआरती करण्यात येणार असून त्यानंतर १९९२ साली कार सेवक म्हणून अयोध्येला गेलेल्या मतदारसंघातील मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर रात्रौ ९.०० वाजता प्रभू श्रीरामाच्या राम लीलांचे दशावतारी नाट्य सादर करण्यात येणार आहे.अशी माहिती आमदार नितेश राणे यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दी पत्राद्वारे दिली आहे.







