२२ जानेवारी रोजी मळई येथे आनंदोत्सव

155

२२ जानेवारी रोजी मळई येथे आनंदोत्सव

देवगड(स्वप्नील लोके) दि २० जानेवारी

देवगड तालुक्यातील मळई हनुमान मंदिरामध्ये राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा निमित्त २२ रोजी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त मळई येथील हनुमान मंदिर मध्ये सोमवार दि २२ जानेवारी २०२४ रोजी आनंद उत्सव साजरा करण्यात येणार आहे . यानिमित्त विविध धार्मिक जामसंडे मळई येथील बालमंडळ संगीत मेळावा या मंडळामार्फत हनुमान मंदिर येथे आयोजित केले असून यानिमित्त सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत , श्रींची पूजा, महाआरती, महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, रामनाम जप , रामरक्षा पठण, श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, महाआरती तीर्थप्रसाद, दीपोत्सव ,स्थानिक भजने रात्री आठ वाजता फटाक्यांची व कार्यक्रमाचे सांगता होणार आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.