अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीबाबत देवगड तहसीलदार व तालुका कृषी विभागाला राष्ट्रीय काँग्रेसचे निवेदन

105

अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीबाबत देवगड तहसीलदार व तालुका कृषी विभागाला राष्ट्रीय काँग्रेसचे निवेदन

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्याची आर्थिक घडी ही केवळ आंबा व काजू फळावर आधारित आहे.परंतु गेल्या दोन दिवसात अचानक वातावरणातील बदल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.त्यामुळे सर्व शेतकरी संकटात सापडला आहे. दिवसेंदिवस फवारणी कीटकनाशके यांचे दर आणि औषध विक्रेते कंपन्यांचा सुळसुळाट देवगडमध्ये जोरात आहे. वर्षानुवर्षी या कंपन्यांच्या व दलालांचा यामुळे फायदाच होतो. मात्र शेतकरी देशोधडीला लागला पहायला मिळतो. त्यावर पर्याय म्हणून पीक विम्याचा मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात यावा. तसेच औषध विक्रेत्यांना कंपन्याना तंबी देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यात यावा.

आणि देवगडमधील शेतकऱ्यांना बागायतदारांना दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देवगड तालुका कृषी विभाग व देवगड तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, माजी तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, तुषार भाबल, सज्जाउद्दीन सोलकर, सुरेश देवगडकर आदी उपस्थित होते.