शाळेच्या ग्रंथालयाला पुस्तकांची भेट देऊन केला आर्याने वाढदिवस साजरा
देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगांव येथील शिरगाव हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी आर्या चंद्रकांत तावडे. इयत्ता सहावी मध्ये शिकत असून आज आर्या चा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त तिने शाळेच्या ग्रंथालयाला पाच गोष्टींच्या पुस्तकांचा संच भेट दिला.
आज वाचन संस्कृती लोप होत चालली आहे मात्र तरीही आर्या हीने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आपला वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करून एक वेगळा पायंडा इतर शालेय विद्यार्थ्यांना घालून दिल्याचे मत संस्था पदाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले. आर्याने दिलेल्या पुस्तक संचाबद्दल संस्था पदाधिकारी, ग्रंथालय कर्मचारी व पालक वर्ग यांनी तिचे आभार व्यक्त करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.







