तालुकास्तरीय ज्ञानी मी होणार स्पर्धेत बागमळा शाळेचे यश
देवगड प्रतिनिधी
देवगड तालुकास्तरीय कला क्रीडा सांस्कृतिक ज्ञानी मी होणार महोतसवात जिल्हा परिषद बागमळा शाळाचे विद्यार्थी ज्ञानी मी होणार मध्ये कुमारी शर्वरी साटम व नाविन्या बावकर यांनी प्रथम क्रमांक मिळाला दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.
तसेच नृत्यकला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. जे संपादन केले त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक श्री कदम तहसील मार्गदर्शक शिक्षिका प्रियांका पाटकर यांचे विशेष मार्गदर्शन केले .या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच ग्रामस्थांनी या मुलांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.





