गोमांतक साई सेवक पालखी पदमात्रेचे बांद्यातील साईमठातर्फे भक्तीमय वातावरणात स्वागत
बांदा (मंगल कामत)
गोवा ते शिर्डी अशी निघालेल्या पायी पदमात्रेचे बांदा शहरातील ऐतीहासीक साईभक्त कै.बाप्पा केसरकर संस्थापीत साई मठाच्या वतीने भक्तीपुर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. या पालखी पदमात्रेत सुमारे ११० साईभक्त सहभागी झालेले होते. साईमठात शिर्डीमाझे पंढरपुर हि आरती करण्यात आली.या वेळी साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, साईराज साळगांवकर ,साईशकुमार केसरकर, प्रितेश केसरकर, मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र मालवण तर, खजीनदार राजेश कारेकर,सचीव दत्तप्रसाद केसरकर, प्रियम हरमलकर ,ज्ञानेश्वर केसकर, हरमलकर, सौ दर्शना केसरकर, सौ राजश्री तेंडले, सौ श्रेया केसरकर, सौ प्रिया केसरकर, मंगलदास सांळगवकर, राज हरमलकर, विजय कासार, अक्षय मयेकर, सौ उमांगी मयेकर, पाडुरंग बांदेकर उपस्थित होते.





