कुणकेश्वर शिवतीर्थावर मंजुर झालेल्या या विकास कामांचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

112

कुणकेश्वर शिवतीर्थावर मंजुर झालेल्या या विकास कामांचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

देवगड (प्रतिनिधी)

वाहन तळाजवळ शौचालय व स्वच्छतागृही उभारणार

देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर येथील पादचारी मार्गाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांनी केले सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेतून या कामासाठी आमदार नितेश राणे यांनी निधी मंजूर केला आहे.

कुणकेश्वर येथील वाहन तळाजवळील शौचालय व स्वच्छतागृह यासाठी ही निधी मंजूर झाला असून या कामांची भूमिपूजनही यावेळी करण्यात आली.

गेले कित्येक वर्ष भाविकांसाठी असलेला हा पादचारीमार्ग व्हावा म्हणून तेथील ट्रस्ट ग्रामस्थ व ग्रामपंचायत सतत पाठपुरावा करीत होती आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणात लक्ष घालून हा निधी मंजूर केला.

 यावेळी माजी आमदार अजित गोगटे, कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर,कुणकेश्वर माजी सरपंच तथा शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वरचे अध्यक्ष  चंद्रकांत घाडी, भाजपा जिल्हा पदाधिकारी बाळ खडपे, प्रकाश राणे, मिठमुंबरीचे सरपंच बाळकृष्ण गावकर यांच्यासह अनेक नागरिक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.