बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

39

बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

बांदा (मंगल कामत)

बांदा येथील गोगटे – वाळके महाविद्यालयात ‘तिमिरातुनी तेजाकडे’ हा शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर मार्गदर्शन निशुल्क असून या विषयाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सीमा शुल्क विभाग, मुंबई) हे आहेत. या व्याख्यानासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क आकारले जाणार नसून शिबिरार्थींनी वही आणि पेन सोबत आणावे. या शिबिराचा परिसरातील विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करिअर कट्टा तालुका समन्वयक प्रा. रमाकांत गावडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.