वाडातर पालयेवाडी येथील दोन रस्त्यांचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

69

वाडातर पालयेवाडी येथील दोन रस्त्यांचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यातील वाडातर पालयेवाडी, तसेच पालेवाडी येथील सप्तकोटेश्वर मंदिराजवळील रस्ता या दोन कामांची भूमिपूजने आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली.

या दोन्ही रस्त्याचे खडीकरण, मजबुतीकरण, व डांबरीकरण करणे असे कामाचे स्वरूप असून आमदार नितेश राणे यांनी ही कामे नुकत्याच झालेल्या पुरवणी अंदाजपत्रकात मंजूर करून आणले आहे.

यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, जिल्हा पदाधिकारी बाळा खडपे, पडेल सरपंच यांच्यासह अनेक नागरिक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.