मुणगे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंजली सावंत यांची बिनविरोध निवड

231

मुणगे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंजली सावंत यांची बिनविरोध निवड

देवगड (स्वप्नील लोके)

देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अंजली अशोक सांवत यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
मुणगे ग्रामपंचायत सरपंच पदाचा साक्षी गुरव यांनी राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी शुक्रवारी मुणगे ग्रामपंचायत कार्यालय येथे निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी अंजली अशोक सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनील राठोड यांनी अंजली सांवत यांची बिनविरोध निवड जाहीर केली,
यशस्विनी प्रतिष्ठान मुणगे आणि संघर्ष मित्र मंडळ आडबंदर अध्यक्ष आनंद मालाडकर यांच्या तर्फे नवनिर्वाचित सरपंच अंजली सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले उपस्थितांना लाडू व पेढे वाटप करून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी नवनिर्वाचित सरपंच अंजली अशोक सावंत. उपसरपंच संजय घाडी. ग्रामपंचायत सदस्य धर्माजी आडकर,रविना मालंडकर,परिता नाटेकर, संजय बांबुळकर, गोविंद सावंत
आनंद मालाडकर,निवडणूक निर्णय अधिकारी सुनील राठोड . सुनिल सावंत, प्रकाश मुरकर , पुरूषोत्तम तेली, सुरबा सावंत . पोलीस पाटील साक्षी गोविंद सावंत. बंडू आचरेकर ,प्रशांत सावंत आदींसह मुणगे ग्रामस्थ व महिला उपस्थित होते, सर्वाना सोबत घेऊन गावचा विकास करण्याचा प्रयत्न राहील असे यावेळी सरपंच अंजली अशोक सांवत यांनी सांगितले.