माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदार निधीतून मिठमुंबरी येथे सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन

477

माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदार निधीतून मिठमुंबरी येथे सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन

देवगड (स्वप्नील लोके)

तालुक्यातील मिठमुंबरी येथील प्रसिद्ध श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिराच्या शेजारी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदार निधीतून मिठमुंबरी येथे सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते करुन कणकवली विधानसभा प्रमुख, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

 

या प्रसंगी युवासेना तालुका प्रमुख व देवस्थान ट्रस्टचे सचिव गणेश गांवकर , ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग डामरी, मुंबई मंडळाचे सचिव रामदास गांवकर, सुभाष गांवकर, अमित तोडणकर, दीपक तोडणकर,न्यू एनर्जी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष निळकंठ गांवकर, लक्ष्मण वाघट, हेमंत तोडणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.