कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंचपदी महेश ताम्हणकर यांची बिनविरोध निवड
देवगड(स्वप्नील लोके)
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाचे महेश ताम्हणकर यांचे बिनविरोध निवड करण्यात आली. कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे तात्कालीन सरपंच चंद्रकांत घाडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी कुणकेश्वर ग्रामपंचायत येथे सरपंच पदाची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महेश ताम्हणकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासन अधिकारी डी. बी. पावसकर यांनी महेश ताम्हणकर यांची बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केले. कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंचपदी महेश ताम्हणकर यांची निवड झाल्यानंतर विद्यमान प्रभारी सरपंच शशिकांत लब्दे, माजी सरपंच चंद्रकांत घाडी, तसेच ग्रामपंचायत सदस्य , सदस्या, ग्रामसेवक गुणवंत पाटील, मित्रपरिवार व कुणकेश्वर ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.





