तळवडे ग्रामपंचायत सरपंचपदी गोपाळ रुमडे विराजमान
देवगड(स्वप्नील लोके)
- देवगड तालुक्यातील तळवडे, तळेबाजार,बागतळवडे ग्रामपंचायत सरपंचपदी गोपाळ सुर्यकांत रुमडे यांनी गणेश लाड यांचा पाच मतांनी पराभव करत सरपंचपदाची माळ खेचून आणली.
तळवडे ग्रामपंचायतीचे तात्कालीन सरपंच पंकज दुखंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी तळवडे ग्रामपंचायत येथे सरपंच पदाची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. तळवडे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी भाजपचे गोपाळ रुमडे व भाजपचे गणेश लाड असे दोन अर्ज दाखल झाले होते.त्यामुळे या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.यामध्ये भाजपाचे गोपाळ रुमडे यांनी गणेश लाड यांचा पाच मतांनी पराभव करत विजयी झाले. त्यामुळे तळवडे सरपंच पदाची माळ गोपाळ रुमडे यांच्या गळयात पडली.तळवडे ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झालेबद्दल माजी सरपंच पंकज दुखंडे, श्र्वेता शिवलकर, ग्रामसेवक गुणवंत पाटील,सदस्या भावना शिंगारे, भाग्यश्री धुरी,सुजाता घाडी,मानसी माणगावकर, आदींनी अभिनंदन केले.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासन अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी काम पाहिले. को





