विजयदुर्ग येथे मराठा आरमार म्युझियम उभारणार.! ; माजी आमदार प्रमोद जठार यांची माहिती.

21

देवगड : सिंधुरत्न योजनेतून विजयदुर्ग किल्ल्यासमोर असलेल्या बांधकाम विभागाच्या दोन एकर जागेत महाराष्टाला अभिमान वाटेल असे शिवाजी महाराजांच्या आरमाराचे संग्रहालय लवकरच साकारणार असून यासाठी साडेचार कोटी रूपये मंजुर झाले आहेत अशी माहिती माजी आ.प्रमोद जठार यांनी दिली.यावेळी त्यांनी खा.विनायक राऊत यांच्यावर कडाडून हल्ला बोल केला. खा.राऊत यांनी रोजगारात्मक प्रकल्पांना विरोध करून कोकणातील दोन पिढ्यांचे नुकसान केले आहे अशा प्रकारच्या रोजगाराला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींना यावेळी महायुतीचा उमेदवार घरी बसवले असा इशारा जठार यांनी राऊत यांना दिला.
जामसंडे सांस्कृतिक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी माजी आमदार अँड.अजित गोगटे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, महेश खोत उपस्थित होते.
जठार म्हणाले, सिंधु रत्न योजनेतुन विजयदूर्ग किल्ल्यासमोर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन एकर जागेत हे म्युझियम प्रस्तावित करण्यात आले असून साडेचार कोटी निधी मंजुर झाला आहे यासाठी पालकमंत्री रविद्र चव्हाण, सिंधूरत्न समितीचे अध्यक्ष तथा शिक्षणमंत्री दिपक केसरकर व आमदार नितेश राणे यांचे मोठे सहकार्य लाभले.
यांचा सहकार्यातूनच हे भव्यदिव्य म्युझियम लवकरच साकारणार असून हे म्युझियम पर्यटनामध्ये भर टाकेल तसेच पर्यटनात वाढीचे ताकदीचे केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विजयदूर्ग किल्ला हा राजा भोज यांनी बांधला.या किल्ल्यावर लढाया झाल्या.त्याची माहिती तसेच आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी, ज्यांनी शिवाजी महाराजांना आरमार बांधणीत मदत केली अशा थोर विभूतींची माहिती, स्टॅच्यू, तसेच मोठ्या जहाजाची प्रतिकृती,.लेझर शो, आरमारा बाबत सर्व माहिती, थोरपुरूषांची माहिती, आरमारा बाबत मिळेल ती माहिती, दस्तऐवज यांची ही माहिती या म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे.याच ठिकाणी हेलिअम सेंटरही होणार असून याबाबतची माहिती संकलनकरण्यासाठी डॉ.सुनिल आठवले व विजयदूर्ग येथील राजेंद्र परूळेकर यांचे सहकार्य लाभले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यानंतर सिंधुदूर्ग व राजकोट किल्ल्याकडे पर्यटकांची संख्या तिप्पटीने वाढली असे जठार यांनी सांगीतले.
खा.विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल
खा.विनायक राऊत यांनीकायम रिफायनरी, सी-वर्ल्ड सारख्या रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला.गेल्या दहावर्षात एकतरी रोजगार आणला का उलट रोजगार देणाऱ्या या प्रकल्पाला विरोध केला.कोकणातील दोन पिढ्यांचे त्यांनी नुकसान केले.येथिल युवकांना कुठल्याही प्रकार चा रोजगार दिला नाही.त्यांनी कोकणातील बेरोजगारांचा अंत पाहू नये असा इशारा जठार यांनी दिला.लोकसभेची निवडणूक ही बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी व रोजगार आणत असताना ज्यांनी विरोध केला त्यांचा विरोधातील लढाई असणार आहे.महायुतीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी जो उमेदवार जाहीर करतील त्याला निवडून आणणार असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.