बांदा येथील मोफत नेत्र चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.! ; बांदा ग्रामपंचायत, रुक्मिणी सुपर बाजार यांचे संयुक्त आयोजन.

16

बांदा : बांदा ग्रामपंचायत व रुक्मिणी सुपर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृहात आयोजित ,आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३४० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. तर ३२४ रुग्णांना चष्माचे वाटप करण्यात आले.
शिबिराचे उदघाटन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर तोरसे (गोवा) येथील जिल्हा परिषद सदस्या सौ. सीमा खडपे, रुक्मिणी सुपर बाजारचे संचालक विजय तोरसकर, बांदा ग्रामपंचायत सदस्य शामसुंदर मांजरेकर, साईप्रसाद काणेकर, आबा धारगळकर, सौ. रुपाली शिरसाट, सौ. श्रेया केसरकर, सौ. तनुजा वराडकर, प्रशांत बांदेकर, सौ. देवल येडवे, सौ. दिपलक्ष्मी पटेकर, साईश तोरसकर, शैलेश केसरकर, सुशांत ठाकूर, रमेश बुठे, सुनील धुरी आदी उपस्थित होते.
या शिबिरात दिवसभरात ३४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी ३२४ रुग्णांना तीन हजार रुपये किमतीचा चष्मा १६० रुपये किमतीत वितरित करण्यात आला.


प्रियांका नाईक म्हणाल्या की, ग्रामपंचायतच्या वतीने अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून रुक्मिणी सुपर बाजारच्या सहकार्याने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .आभार विजय तोरसकर यांनी मानले.