जामसंडे येथे २३ डिसेंबर रोजी ‘शौर्या तुला वंदितो २०२३’.! ; सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग विभागाचे आयोजन.

28

देवगड : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान – सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने जामसंडे येथे २३ डिसेंबर रोजी ‘शौर्या तुला वंदितो २०२३’.! या कार्यक्रमांतर्गत माजी सैनिक सन्मान व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. देशासाठी आपले प्राणपणाला लावून देशसेवा केलेल्या माजी सैनिक यांच्या शौर्याप्रती व साहसाप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी व विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार कार्यक्रम शनिवार, दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०९:३० वाजता कै. मोरेश्वर जनार्दन गोगटे सभागृह, जामसंडे, श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक (व्यवसाय) विद्यामंदिर, जामसंडे (ता. देवगड) येथे आयोजित केला आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान – सिंधुदुर्ग विभाग यांनी केले आहे.

सन्मान भारतमातेच्या सुपुत्राचा – सत्कार माजी सैनिकांचा.!

अशी आहे कार्यक्रमाची रूपरेषा –

सकाळी ०९:३० वाजता – माजी सैनिक व प्रमुख पाहुणे यांचे आगमन.
सकाळी ०९:४५ वा – छत्रप्रती शिवाजी महाराज व भारतमातेचे पूजन त्यानंतर अमर जवान यांना सन्मान चक्र वाहणे.
सकाळी १०:०० वा – मान्यवर स्वागत व प्रस्तावना.
सकाळी १०:१५ वा – माजी सैनिक सन्मान.
सकाळी १०:३० वा – प्रमुख पाहुणे यांचा सन्मान.
सकाळी १०:४५ वा – गुणवंत विद्यार्थी सत्कार.
सकाळी ११:०० – प्रमुख पाहुणे भाषण.
सकाळी ११:४५ – श्री श्रमिक गोजमगुंडे सर (हुकूम) यांचे मार्गदर्शन – संस्थापक / अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान – हिंदुस्थान.
दुपारी १२:३० वा. उपस्थित यांचे आभार.
दुपारी ०१:०० वा. – स्नेहभोजन व समारोप.

अधिक महितीसाठी संपर्क क्रमांक – 

सुनील राऊळ – 9637826315
विनोद पाटील – 9324632492
हितेश कोयंडे – 7083888130
दिपक करंजे – 9405348586